कागदपत्र तपासणीसाठी अधिकारी येणार घरी
मुंबई - रेशन कार्डवरील किरकोळ दुरुस्तींसाठी नागरिकांना वारंवार पुरवठा विभाग, तलाठी कार्यालय आदी ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. या त्रासातून आता सुटका होणार आहे. रेशन कार्डशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग सज्ज झाले आहे. नवे रेशन कार्ड बनविण्यापासून नाव व पत्ता दुरुस्ती, नाव कमी करणे, शिधापत्रिका रद्द करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. काही महिन्यांतच ही सुविधा राज्यातील नागरिकांना वापरता येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कॉमन ऍप्लिकेशन
सॉफ्टवेअर (कॅस)द्वारे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या
संगणकीकरणाचा "मिशन मोड‘ प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत "एंड टू एंड‘ संगणकीकरण करण्याचा उद्देश आहे.
नव्या रेशन कार्डसाठीची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याकरिता "नॅशनल
इन्फॉर्मेटिक्स सिस्टिम‘कडून सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. सध्या त्याचे
आणि संकेतस्थळाचे मराठीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नव्या
रेशन कार्डसाठी आधार कार्डची नोंदही महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत आधार
कार्ड लिंकिंगचे 77 टक्के काम पूर्ण झाले आहे. आधार कार्डमुळे बनावट
शिधापत्रिकाधारकांना चाप बसेल. आधार कार्डच्या नोंदीमुळे नव्या
शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना सगळ्या माहितीची पडताळणीही शक्य होईल. रेशन
कार्डसाठी केलेल्या जाणाऱ्या अर्जात बॅंकेच्या तपशिलाचाही समावेश असेल.
त्यामुळे धान्याच्या बदल्यात सबसिडी मिळाली, तरीही ती थेट नागरिकांच्या
बॅंक खात्यावर जमा करणे शक्य होईल.
ऑनलाइन प्रक्रिया...
नव्याने अर्ज करण्यासाठी नागरिकांना यूजर नेम आणि वन टाइम पासवर्ड लॉग इन करावा लागेल. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील. ऑनलाइन दिलेल्या माहितीद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी थेट संबंधित अर्जदाराच्या घरी येऊन कागदपत्रांची खातरजमा करतील. त्यानंतर शेराही ऑनलाइन दिल्यानंतर रेशन कार्ड दिले जाईल.